निजामपूर पोलिस स्टेशनमध्ये २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांचा मुद्देमाल गहाळ,दोन हवालदार निलंबित

धुळे जिल्हा पोलिस दलात मोठी कारवाई झाली असून जवळपास २०० पेक्षा अधिक गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल गहाळ केल्याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कारवाई केली असून निलंबित हवालदारांची नावे महेंद्र जाधव आणि शरद ठाकरे अशी आहेत.

मुद्देमाल जमा करण्याबाबत वरिष्ठांनी दोघांना अनेकदा ताकीद दिली होती. पुरेसा वेळ देऊनही त्यांनी मुद्देमाल सादर केला नाही. त्यांच्या वारंवार चौकशी करण्यात आली, मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कठोर निर्णय घेण्यात आला.

  • Related Posts

    अजीत पवार Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या लाडक्या ‘दादा’ला उद्या अखेरचा निरोप शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार

    बारामती | Baramati – Date : 28/01/2026 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी आज (बुधवारी) बारामतीमध्ये एका भीषण विमान अपघातात…

    धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या

    धुळे तालुक्यातील बोरिस गावात एकाच रात्री सलग १५ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घरफोड्या झाल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. चोरट्यांनी आता शहरी भागापाठोपाठ ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला असून, या धाडसी कारवायांमुळे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *